औरंगाबाद पालिकेचं दुर्लक्ष,भूमामियांची चांदी !

June 18, 2013 7:29 PM0 commentsViews: 142

aurangabad corporationसिध्दार्थ गोदाम, औरंगाबाद

18 जून : औरंगाबाद महापालिका गैरकारभारामुळे सध्या चर्चेत आहे. शहराच्या विकासावर सत्ताधारी किंवा विरोधकांना बोलायला वेळ नाही.महापालिकेतील अराजकतेचा फायदा आता भूमाफिया उचलत आहे.

महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक यांचं महापालिकेच्या कारभाराकडे संपूर्ण दुर्लक्ष असल्याचं गेल्या काही वेळात सातत्यानं आढळून आलं आहे. याचाच फायदा घेत भूमाफियांनी औरंगाबादमधील नारेगावात 14 एकर जागेवर कब्जा केला. धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेचे अधिकारी या अतिक्रमाणाबद्दल उडवा उडवीची उत्तर देवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहे.

औरंगाबादच्या जिल्हाधिकार्‍यांनी नारेगावात 14 एकर जागा शाळा, गोसावी समाजाची स्मशान भूमी, हिंदू समाजाची स्मशान भूमी याकरता महापालिकेसाठी आरक्षित केली होती. मात्र महापालिकेतील अधिकारी आणि भूमाफियांनी संगनमत करून ही जागा बळकावल्याचा आरोप स्थायी समितीच्या सभापतींनी केला.

हे सगळं गेल्या अनेक वर्षांपासून घडतंय. मात्र एकाही अतिक्रमणावर कारवाई करण्याची हिम्मत महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दाखवलेली नाही. आता सगळ्याबाबत महापालिका आयुक्त नेमकी काय भूमिका घेतायत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

close