‘प्राणदाता’ जगदीश खरे ‘लिम्का बुक’मध्ये

June 18, 2013 7:36 PM0 commentsViews: 463

jadish khare nagpurनागपूर 18 जून : गेल्या 22 वर्षांपासून नागपूरच्या गांधीसागर तलावात बुडणार्‍यांना 400 पेक्षा जास्त लोकांचा जीव वाचवणार्‍या जगदीश खरे यांच्या कार्याची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्‌ने घेतली आहे. लिहीता वाचता न येणार्‍या जगदीश यांना एका व्यक्तीने त्यांना लिम्का बुक ऑफ रेकॉर्डच्या पुस्तकात त्यांचा उल्लेख असल्याचे सांगितलं.

 

तेव्हा जगदीश खरे यांना याबद्दलची माहिती मिळाली. कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता जगदीश खरे गांधीसागर तलावात उडी मारून लोकांचे प्राण वाचवतात. आजपर्यंत त्यांनी 400 च्यावर लोकांचे प्राण वाचवले आहेत. तर 1100 च्या वर लोकांचे मृतदेह त्यांनी तलावाच्या बाहेर काढले आहेत.

 

जगदीश खरे यांच्या कार्यात त्यांच्या पत्नी जयश्री खरे या सुद्दा मदत करत असतात. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये नाव आल्याने जगदीश खरे यांनी आनंद व्यक्त केला आहे. आपले प्राण असेपर्यंत हे काम सुरु ठेवणार असल्याचा निश्चय जगदीश खरे यांनी केला आहे.

close