26/11 नंतरही सुरक्षाव्यवस्था कमकुवतच

January 14, 2009 9:57 AM0 commentsViews: 3

14 जानेवारीमुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा हा देशाच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. सरकारनं मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात नॅशनल सिक्युरिटी गार्ड आणि नॅशनल इनव्हेस्टिगेटिव् एजन्सी स्थापन करण्याची घोषणा केली होती. पण त्या घोषणेला 2 महिने होत आले तरी अजून कुठेच कामाला सुरुवात झालेली दिसत नाही. एनएसजी आणि एनआयएच्या उभारणीचं काम थंड्या बस्त्यात पडलंय. मुंबई,कोलकाता,चेन्नई आणि हैदराबाद या चार ठिकाणी सरकार नॅशनल सिक्युरिटी गार्डची स्थापना करणार होती. 26 नोव्हेंबरला झालेल्या हल्ल्यात एनएसजीचे जवान उशिरा पोहोचले होते. त्यामुळे पुन्हा 26 नोव्हेंबर सारखी परिस्थिती उद्भवल्यास ताबडतोब हालचाल करता याव्यात या दृष्टीने एनएसजीची चार ठिकाणी उभारणी करण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला होता.

close