नागपूरमध्ये 30 फूट उंचीची पतंग

January 14, 2009 10:16 AM0 commentsViews: 8

14 जानेवारी, नागपूर कल्पना नळसकर मकरसंक्रांत आली की आकाशात रंगीबेरंगी पतंगच पतंग पाहायला मिळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे जण पतंग उडवतात. पण नागपूरच्या आकाशात 30 फूट उंचीची पतंग उडणार आहे .नागपूरच्या गुलाबराव जागिड यांना आकारानं मोठे पतंग उडवण्याचा षौक आहे. यंदा त्यांनी 30 फूट उंचीची पतंग तयार केली आहे. सहा वर्षांपूर्वी गुलाबरावांनी पाच फूट आकाराची पतंग बनवली. प्रत्येक वर्षी त्याच्या आकारात वाढ होत आहे. यंदाचा गुलाबरावांच्या पतंगांचा आकार आहे आता 30 बाय 25 फूट. त्यावर त्यांनी सामाजिक एकतेचा संदेशही दिला आहे. पतंग उडवण्याच्या छंदाबरोबरच सामाजिक संदेशही लोकापर्यंत पोचवण्याचा गुलाबरावांचा प्रयत्न असतो. लहानांनपासून मोठ्यापर्यंत सर्वच जणांना या पतंगाबद्दल कुतूहल वाटतं. सामाजिक संदेश देणारी ही पतंग गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जावी, अशी गुलाबरावांची इच्छा आहे.

close