उत्तराखंडमध्ये महाडच्या यात्रेकरूचा मृत्यू

June 19, 2013 1:15 PM1 commentViews: 536

UTTARAKHAND deth19 जून : उत्तराखंडात पावसाच्या रौद्र रूपाचे बळी ठरलेल्यांपैकी महाड इथल्या गुलाब दोशी यांचा (वय 64) मृत्यू झाला. वैद्यकीय मदत वेळेत मिळाली नसल्यामुळे दोशींना आपले प्राण गमवावे लागले. त्यांचं पार्थिव मुंबईत आणण्यासाठी काहीही व्यवस्था नसल्यानं त्यांच्या पतीला त्याच ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करावे लागले.

 

गुलाब दोसी यांचे पती लखमीचंद दोसी हे व्यवसायानं सीए असून हे कुटुंब रायगड जिल्ह्यातल्या महाडचे रहिवाशी आहेत. हे नैसर्गिक संकट ओढवल्यानंतर रायगड जिल्ह्यातून गेलेला हा 108 लोकांच्या पर्यटकांच्या चमूनं गेल्या पाच दिवसांपासून बद्रीकेदारनाथच्या लोकपरमार्थ धर्मशाळेत आश्रय घेतला होता. या दिवसांमध्ये त्यांना अन्नही मिळेनासं झालं. महाराष्ट्र सरकारकडून अजून कोणत्याही स्वरूपाची मदत या संकटात फसलेल्या लोकांना मिळू शकलेली नाही.

  • Brahmin Yuva Manch

    आपल्या कर्तव्य शून्य सरकार मुळे नाहक बळी..

    स्वातंत्र्याच्या इतक्या कालखंडात आपण साधे आपत व्यवस्थापन शिकलो नाहीत..

close