नितीशकुमारांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

June 19, 2013 3:57 PM1 commentViews: 702

nitish kumar3नवी दिल्ली 19 जून : एनडीएतून बाहेर पडल्यामुळे आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. काँग्रेस आणि ठरावाच्या बाजूने 126 तर विरोधात 24 मतं पडली. भाजपनं मतदानावर बहिष्कार टाकला. जेडीयूला 122 मतांची अपेक्षा होती पण काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या पाठिंब्यामुळे 126 मत मिळाली. फक्त आरजेडी आणि एलजेपीने प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं. विरोधात फक्त 24 मत मिळाली.

भाजपच्या प्रचारप्रमुखपदी नरेंद्र मोदींची निवड झाल्यानंतर भाजपमध्ये जेष्ठांनी हादरा दिलाच तर 17 वर्षांपासून सोबत असलेल्या जेडीयूनेही साथ सोडली. रविवारी जेडीयूचे अध्यक्ष शरद यादव आणि नितीशकुमार यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. यावेळी विश्वासदर्शक ठरवा आणण्यासाठी नितीशकुमारांनी विधानसभेचं अधिवेशन बोलावलं होतं. अपेक्षेप्रमाणे भाजपने या बहिष्कार टाकला. विश्वासदर्शक ठरावाच्या भाषणात बोलताना नितीशकुमारनी भाजप आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली. कोणत्याही परिस्थितीत जेडीयूच्या धर्मनिरपेक्ष विचारसरणीशी तडजोड केली जाणार नाही, असं नितीशकुमारनी स्पष्ट केलं.

 

नितीशकुमारांनी डागली मोदींवर तोफ

 

युती तुटण्याअगोदर भाजप आणि जेडीयू काम करत होती तेंव्हा बिहार आणि बाहेर काहीही अडचण नव्हती. पण जेंव्हा बाहेरच्या लोकांनी (मोदींनी) येऊन सूत्रहाती घेतली. भाजपचा असा भ्रम झाला की, कार्यकर्ते उत्साहीत झाले म्हणून देश मुठ्ठीत आलाय असं त्यांना वाटू लागलं आहे.

पण हा केवळ भ्रम आहे. हे दिवास्वप्न आहे आणि हे तुटणार अशी टीका नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली. आम्ही युती टीकवण्याचा परीपूर्ण प्रयत्न केला पण कोणताही मार्ग शिल्लक राहीला नाही. यावर शायरी करत खुलासा केला. “आया तो बार बार संदेसा आमीर का, हमसे मगर हो न सका सौदा जमीर का..”

  • SANDESH SAKHARE

    MANJRACHI UNDRALA SAKSH

close