नितीशकुमारांनी मोदींवर डागली तोफ

June 19, 2013 4:20 PM0 commentsViews: 369

modi vs nitishkumarनितीशकुमारांनी डागली मोदींवर तोफ

नवी दिल्ली 19 जून : युती तुटण्याअगोदर भाजप आणि जेडीयू काम करत होती तेंव्हा बिहार आणि बाहेर काहीही अडचण नव्हती. पण जेंव्हा बाहेरच्या लोकांनी (मोदींनी) येऊन सूत्रहाती घेतली. भाजपचा असा भ्रम झाला की, कार्यकर्ते उत्साहीत झाले म्हणून देश मुठ्ठीत आलाय असं त्यांना वाटू लागलं आहे.

पण हा केवळ भ्रम आहे. हे दिवास्वप्न आहे आणि हे तुटणार अशी टीका नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली. आम्ही युती टीकवण्याचा परीपूर्ण प्रयत्न केला पण कोणताही मार्ग शिल्लक राहीला नाही. यावर शायरी करत खुलासा केला. “आया तो बार बार संदेसा आमीर का, हमसे मगर हो न सका सौदा जमीर का..”

close