सत्यमच्या ऑडिट फर्मनं हात झटकले

January 14, 2009 10:32 AM0 commentsViews: 4

14 जानेवारीसत्यमचं मॅनेजमेंट स्वत:च सर्व फायनान्शिअल स्टेटमेंट्स तयार करीत होतं. असा ग्यौप्यस्फोट आता सत्यमची ऑडिटर फर्म पीडब्ल्यूएचसी म्हणजे प्राईसवॉटरहाउस कूपरनं केलाय. सत्यमच्या नव्या बोर्डाला पीडब्ल्यूएचसीनं एक पत्र लिहीलं आहे. आमच्याकडून ऑडिट केलेल्या सत्यमच्या रिपोर्ट खरं मानू नये असं या चिठ्ठीत पीडब्ल्यूएचसीनं म्हटलंय. सत्यम प्रकरणात सरकारला सर्वप्रकारे मदत करू, असंही आता पीडब्ल्यूएचसी म्हणत आहे. दरम्यान रिझर्व्ह बँकेकडूनही पीडब्ल्यूएचसीची चौकशी होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्लोबल ट्रस्ट बँकेच्या घोटाळ्यानंतर आरबीआयनं डिसेंबर 2008 पर्यंत 'प्राईसवॉटरहाउस कूपर' वर बंदी घातली होती.

close