पावसामुळे उन्हाळी धानाचं नुकसान

June 19, 2013 5:30 PM0 commentsViews: 203

bhandaraभंडारा 19 जून : विदर्भात पावसाच्या आगमनानं शेतकरी सुखावला असला तरी भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात पावसानं उन्हाळी धानाचं नुकसान केलंय. तुमसर तालुक्यातील शेतकरर्‍यांना चांदपूर जलाशयाचं पाणी मिळालंय.

त्या पीकावर 52 गावातील सुमारे सोळाशे हेक्टरवर उन्हाळी धान लावण्यात आलं. हे धाण काढणीला असतानाच पावसाचं आगमन झालंय. सलग तीन दिवस सुरु असलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांना हाताशी आलेलं धान उचलणं शक्य झालं नाही.

त्यामुळे हे धान आता शेतात कुजू लागलंय. तर अनेक ठिकाणी धानाला कोंब फुटल्यानं धान वाया गेलंय. कृषी विभागानुसार 70 टक्के धानाचं नुकसान झालंय. या नुकसान भरपाई पोटी प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयांची भरपाई मिळावी अशी मागणी आमदार नाना पटोले यांनी केली आहे.

close