सत्यम घोटाळा दुदैर्वी : नारायणमूर्ती

January 14, 2009 10:39 AM0 commentsViews: 7

14 जानेवारी सत्यम कॉम्प्युटर्समध्ये झालेल्या घोटाळा दुदैर्वी असल्याचं इन्फोसिसचे प्रमुख संस्थापक नारायणमूर्ती म्हणाले. सत्यमच्या नव्या बोर्डावरील सदस्यांची निवड अत्यंत उत्तम आहे असं त्यांना वाटतंय, मात्र सत्यमच्या बोर्डावर स्वत: सहभागी होण्याबाबत त्यांनी असमर्थता दर्शवलीय. "मला वाटतं आता जी बोर्ड सदस्यांची निवड केलीय ती अतिशय योग्य आहे. अजूनही काही सदस्य या संचालक मंडळावर येतील त्यांचाही अनुभव कामी येईलच,पण माझ्या मते आता जे सदस्य सरकारनं निवडलेत ते खरंच सर्वोत्तम आहेत." असं नारायणमूर्ती यांनी सांगितलं.

close