उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातले 1 हजार 356 यात्रेकरू अडकले

June 19, 2013 6:31 PM0 commentsViews: 607

utarakhhandfloods1 (6)19 जून : उत्तराखंडमध्ये पावसाने थैमान घातलंय. केदारनाथच्या यात्रेवर गेलेल्या महाराष्ट्रातले 1 हजार 353 यात्रेकरू उत्तराखंडमध्ये अडकले आहे. त्यातले 334 प्रवासी बेपत्ता आहेत. 9 महिला प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. 1 हजार 19 जणांशी संपर्क झाला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही माहिती दिली. उत्तरखंडला उत्तराखंडसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 कोटींची मदत जाहीर केली आहे. हरिद्वारला आणखी एक मदतकेंद्र स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय. राज्यातल्या प्रवाशांना दिल्लीहून विमानानं परत मुंबईत आणण्यात येणार आहे.

close