महाराष्ट्र सरकारकडून उत्तराखंडला 10 कोटींची मदत

June 19, 2013 7:15 PM0 commentsViews: 350

cm pruthaviraj chavhan
19 जून : उत्तराखंडसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने 10 कोटींची मदत जाहीर केली आहे. तिथे अडकलेल्या राज्यातल्या प्रवाशांना राज्य सरकारतर्फे मदत पुरवण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत.

 

दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातील अतिरिक्त निवासी आयुक्त प्रदीप कुमार यांच्या नेतृत्वाखाली एक पथक डेहरादूनला रवाना करण्यात आलंय. या कार्यालयातून महाराष्ट्रातल्या यात्रेकरूंना योग्य ती मदत केली जाणार आहे. अडकलेल्या प्रवाशांना मदत आणि माहितीसाठी हेल्पलाईनही सुरू करण्यात आल्या आहेत.

close