अरबी समुद्रात भरकटलेलं जहाज फुटलं

June 19, 2013 7:39 PM0 commentsViews: 4354

arabian sea mumbaiमुंबई 19 जून : पावसाळा सुरू झाला की उधाणलेल्या समुद्रात बोटींना अपघात होणं, त्या भरकटण्याचे प्रकार घडतात. या वेळी देखील अरबी समुद्रात दोन जहाजांना अपघात झाला आहे.

त्यापैकी एक एमओएल हे जहाज खोल अरबी समुद्रात अपघात होऊन मधोमध फुटलंय,  तर दुसरं मुंबईच्या मढ आयलंड इथं प्रतिभा तापी हे दुसरं मालवाहू जहाज भरकटल्यामुळे अडकलंय.

या जहाजावरच्या कर्मचार्‍यांना वेळेवर पगार न दिल्यामुळे गेले कित्येक महिने हे जहाज मुंबईच्या समुद्रात नांगरून ठेवण्यात आलं होतं. या कर्मचार्‍यांचा पगार लवकरात लवकर देण्यात यावा असे आदेश कोर्टाने दिले होते.

close