येवल्याच्या गच्च्या पतंगवेड्यांनी फुलल्या

January 14, 2009 10:12 AM0 commentsViews: 5

14 जानेवारी नाशिकनाशिकमधल्या येवलेकरांसाठी संक्रांत सर्वांपेक्षा वेगळी असते ती पतंगवेडामुळेच. इथली पतंग उडवली जाते ती चकरीवर नाही, तर आसारीवर चक्रीवर पतंग उडवायला दोनजण लागतात, पण आसारीवर एकजणच पतंग उडवू शकतो. चक्रीपेक्षा आसारीला जास्त धागा गुंडाळला जातो, त्यामुळे कमी वेळेत पतंग जास्त लांब जाते.इथे पतंग उडवण्यापेक्षा जास्त मजा असते ती आपल्या पतंगी वाचवण्यात आणि दुस-यांच्या काटण्यात. किती पतंग काटल्या आणि कटलेल्या किती जमवल्या हेच इथे महत्वाचं असतं. संक्रांतीत नाशिकमधल्या येवल्याच्या गच्च्या पतंगवेड्यांनी फुलतात. डीजेचा ठेका, गाण्यांचा ताल आणि आरोळ्यांचा धुमाकूळ यात हे पतंग आकाशात उडवले जातात.

close