‘रेसकोर्सच्या भूखंडावर पवारांचा डोळा’

June 19, 2013 9:07 PM0 commentsViews: 843

udhav on sharad pawar19 जून :मुंबईतल्या रेसकोर्सचा भूखंड घोडेवाल्यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न होत आहे. रेसकोर्सवर जागतिक दर्जाचं उद्यानं व्हायला हवं. मोकळ्या जागेवर तुमचाच डोळा असतो, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर केला. काहीही झालं तरी शिवसेनाप्रमुखांचं स्वप्न पूर्ण करणार असं उद्धव यांनी ठणकावून सांगितलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरचा शिवसेनेचा आज पहिला वर्धापनदिन साजरा झाला. मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेचा मेळावा पार पडला.
‘शिवसेनेचा चेहरा रुबाबदार, बदलण्याची गरज नाही’

बाळासाहेबांची शिवसेना कालही होती तीच आजही आहे. आम्हाला शिवसेनेचा चेहरा बदलण्याची गरज नाही. सेनेचा चेहरा रूबाबदार आहे आणि तोच राहणार. इतरांसारखा तो कधी विद्रुप झाला नाही त्यामुळे कोणतेही बदल केले जाणार नाही शिवसेना जसी आहे तशीच राहणार असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

‘रेसकोर्सवर उद्यान झालंच पाहिजे’

मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर उद्यान झालं पाहिजे. आपली मुंबई जरी इंग्रजांनी बनवली असली तरी ती मराठी माणसांची मुंबई आहे. आणि ही मुंबई आणखी देखणी वाटू नये असं कोणालाही वाटणार नाही. आम्हीही त्यासाठीच हा प्रयत्न करत आहोत. सीलिंकचा मुद्याही शिवसेनेनं उपस्थित केला होता. बरं तो उभारलाही पण सी लिंकला यांनी यांच्या नेत्यांची नावं दिली. आणि आपणं काम केल्याचं गवगवा केला. बरं ते काहीही असलं आता रेसकोर्सवर जागतिक दर्जाच उद्यान झालं तर त्यात चुकलं काय ? बरं नुसतं झालं पाहिजे असं मी म्हटलो नाही, तर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना याबद्दलचं संकल्पचित्रही दिलं.   तुम्ही चित्र काय पाहताय निदान काम तरी करून दाखवा. आता उद्यान जर झालं तर त्याला पाणी देण्याची व्यवस्था आहे. वाटलं तर रेनवॉटर हॉर्वेस्टींग आहे पण त्यांना मैदानात आणू नका असा टोला उद्धव यांनी अजित पवारांना लगावला.

‘प्रतिष्ठेचा प्रश्न करू नका’

मला हा प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही. ही महापालिकेची जागा आहे, राज्य सरकारची जागा आहे. पण ही जागा मुंबईकरांची आहे. महापालिका आणि सरकारनंतर आलं. अजून आदर्शची जागा कोणाची आहे हे अजून कळालं नाही तर तुम्हाला रेसकोर्सची जागा बरोबर कळतेय असा टोलाही उद्धव यांनी लगावला.

close