पाकिस्तानी कलाकरांविरोधात मनसेचं आंदोलन

January 14, 2009 11:43 AM0 commentsViews: 3

14 जानेवारी, मुंबईमनसेनं आता पाकिस्तीनी कलाकरांविरोधात आघाडी उघडली आहे. मुंबईत कॉमेडी सर्कस शोच्या शूटिंगच्यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सेटवर गोंधळ घातला. पाकिस्तानी कलाकार शकील याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी सेटवरून बाहेर काढलं. मुंबईमधल्या अंधेरीत इथल्या मोहन स्टुडिओमध्ये ही घटना घडली.मनसे नवनिर्माण सेनेच्या चित्रपट विभागाचे 40 ते 50कार्यकर्ते मोहन स्टुडिओ घुसले. येथे सोनीवर सुरू असलेल्या कॉमेडी सर्कस या रिऍलिटी शोचं शूटिंग सुरू होतं. यात शकील सिद्दिकी या पाकिस्तानी कलाकाराचाही सहभाग होता. मनसेनं ताबडतोब त्याला बाहेर काढण्याची मागणी केली. शकील सिद्दिकीला बाहेर न काढल्यास मनसे आपल्या पद्धतीनं आंदोलन छेडेल, असं मनसे कार्यकर्त्यांनी सांगितलं. 26/11 मध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. पाकिस्ताननं मात्र ते पुरावे वारंवार नाकारले आहेत. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांवर कारवाई करत नाही, तोपर्यंत पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करून दिलं जाणार नाही, असं मनसेनं स्पष्ट केलं आहे.

close