जागावाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली

January 14, 2009 12:21 PM0 commentsViews: 3

14 जानेवारी, मुंबईमुंबईतून राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेच्या दोन जागा द्याव्यात अशी मागणी सचिन अहिर यांनी केली आहे. जर काँग्रेसनं एकही जागा सोडली नाही तर मैत्रीपूर्ण लढतीस राष्ट्रवादी तयार आहे, असा इशाराही अहिर यांनी दिला आहे. मंगळवारी काँग्रेसनं मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसाठी मुंबईत एकही जागा सोडू नये अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहीर यांनी हा इशारा दिला आहे.आगामी लोकसभेंच्या जागांसाठी कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. यंदा 26 जागा देण्याची मागणी राष्ट्रवादीन थेट कॉग्रेस हायकमांडकडे केली आहे. तर दुसरी कडे गेल्या निवडणुकांएवढ्याच म्हणजे 22 जागाच राष्ट्रवादीला देण्यात याव्या . तसच मुंबईतील एकही लोकसभंेची जागा राष्ट्रवादीला सोडायची नाही असा अहवाल, प्रदेश कॉग्रेस हायकमांडला पाठवणार असल्याच समजतंय. मंगळवारी वर्षा बंगल्यावर कॉंग्रेस पदाधिकार्‍यांच्या बैठकीत अशी चर्चा झाली . या पाश्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकांच्या प्रत्यक्ष जागावाटपाआधी दोन्ही कॉग्रेसमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगणार हे स्पष्ट झालं आहे.

close