भारत-पाक सीमेवर तणाव : लष्करप्रमुख

January 14, 2009 12:52 PM0 commentsViews:

14 जानेवारीसीमेवर भारत आणि पाकदरम्यान तणाव कायम असल्याची कबुली लष्कर प्रमुख दीपक कपूर यांनी दिली आहे. भारतासाठी सर्व पर्याय खुले असल्याच कपूर म्हणाले. मात्र लष्कराचा वापर करण्याचा निर्णय राजकीय नेतृत्वाचा असल्याच त्यांनी म्हटलंय. पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली मतं व्यक्त केली. लष्करी साहित्य खरेदीची मोहिम युध्दपातळीवर सुरु आहे.पाकिस्तानने फतावरुन लष्करी जवानांना भारतीय सीमेवर हलवलं असल्याचही कपूर यांनी सांगितलं.मालेगाव बॉम्बस्फोट लष्करी अधिकार्‍यांच्या सहभागावर बोलतांना लष्कर प्रमुख दीपक कपूर यांनी आर्मीमध्ये यापुढे अशा घटना रोखण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्यात येतील असं स्पष्ट केलं. याकरता अधिकांर्‍यावर कडक लक्ष ठेवण्यात येईल. तसंच पोस्टिंग देतांना योग्य ती काळजी घेतल्या जाणार असल्याच त्यांनी स्पष्ट केलं.

close