पुन्हा कलमाडी नको !

June 20, 2013 1:59 PM0 commentsViews: 488

kalmadi _puneपुणे 20 जून : इथं होणार्‍या विसाव्या एशियन ऍथलॅटिक्स चॅम्पियनशिप पासून सुरेश कलमाडींना जाणीव पूर्वक दूर ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला आहे. कॉमनवेल्थ गेम्सला गालबोट लावलंय त्यांना या स्पर्थेच्या नियोजनामध्ये सामिल केले जाणार नाही असं थेट व्यक्तव क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांनी पुण्यात केलंय.

 

3 ते 7 जुलै दरम्यानं पुण्यात आशियायी गेम्स होणार आहेत. त्याच्या नियोजनाच्या माध्यमातून पुन्हा राजकारणात सक्रीय होण्याचे कलमाडी यांचे मनसूबे या निर्णयामुळे धुळीस मिळाले आहेत. कॉमनवेल्थ गेम मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे कलमाडी यांना अटक झाली होती. त्यानंतर काँग्रेसने कलमाडींपासून दूर राहण्याचं धोरण स्विकारलं आहे. त्यामुळे या आशियायी गेम्समुळे पुन्हा मुख्यप्रवाहात येण्याचा कलमाडींचा प्रयत्न होता आता बंद झालाय.

close