सत्यमवर जनहित याचिका दाखल

January 14, 2009 1:46 PM0 commentsViews: 6

14 जानेवारी मुंबईमुंबई उच्च न्यायालयात सत्यमवर दाखल करण्यात आलेली जनहित याचिका 22 जानेवारीपर्यत पुढे ढकलण्यात आली आहे. सत्यम कॉम्प्युटर्समधील घोटाळ्याच्या विरोधात इन्वेस्टर ग्रीव्हान्सेस फोरमतर्फे ही जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. सत्यमच्या 18 अधिका-यांना यासंदर्भात नोटिस पाठवण्यात आल्या आहेत. याशिवाय सेबी, एनएसई, राज्य आणि केंद्र सरकारलाही नोटिस बजावली आहे. रामलिंग राजू यांची सर्व प्रॉपर्टी जप्त करावी अशी मागणी फोरमनं केली आहे. रामलिंग सत्यमच्या गुंतवणूकदारांना न्याय मिळावा यासाठी माजी खासदार किरीट सोमय्या आणि इन्वेस्टर ग्रीव्हान्सेस फोरमनं याबाबत पुढाकार घेतला आहे.

close