विश्वनाथन आनंदची पुण्याला भेट

January 14, 2009 2:05 PM0 commentsViews: 3

14 जानेवारी, पुणेदीप्ती बर्वेएनआयआयटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या माईंड चॅम्पियनस अकॅडेमीच्या कार्यक्रमानिमित्त बुध्दीबळातील वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद पुण्यात आलो होता. युवा बुध्दीबळपटूंना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं मत यावेळी त्यानं व्यक्त केलं."पुणे शहराचं माझ्या हृदयात स्थान आहे" हे उद्गार आहेत बुध्दीबळातला वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथ आनंदचे. करियरमध्ये पहिली राष्ट्रीय जलदगती बुध्दीबळ स्पर्धा आनंदनं पुण्यातच जिंकली होती. पुण्यासह महाराष्ट्रानं देशाला अनेक बुद्धीबळपटू दिले. महाराष्ट्रात बुध्दीबळासाठी बरंच टॅलेंट असून इथल्या खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची तयारी विश्वनाथ आनंदनं दाखवली.जागतिक अजिंक्यपद स्पर्धा सर्वात महत्वाची असल्याचं आनंद म्हटलंय. पण लिनारेस स्पर्धा आपली सर्वात आवडती स्पर्धा असल्याचं त्यानं सांगितलं. आनंद यावेळी लहान मुलांबरोबर बुध्दीबळ खेळण्यातही रमला. एनआयआयटीतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेतल्या विजेत्यांचाही यावेळी आनंदच्या हस्ते सत्कार करण्यात आला. छत्तीसगढच्या प्रभा राजवाडेचं आनंदनं विशेष कौतुक केलं.8 ते 14 वयोगटातील खेळाडू सध्या चांगली कामगिरी करतायत आणि त्यांना अधिक प्रोत्साहन द्यायला हवं असं मत यावेळी आनंदनं व्यक्त केलं. छत्तीसगढ, त्रिपुरा, आसाम या सारख्या क्रीडाक्षेत्राता काहीशा मागे पडलेल्या राज्यांमध्ये बुद्धीबळाचा प्रसार करण्यावर सध्या आनंदचा भर आहे.

close