अखेर ‘बिजली’ पायावर उभी राहिली

June 20, 2013 4:54 PM1 commentViews: 547

bijali eliphantमुंबई 20 जून : गेले अनेक दिवस चर्चेत असलेली बिजली हत्तीण उपचारानंतर गेल्या पंधरा तासांपासून स्वत:च्या पायावर उभी आहे. मुलुंड येथे बिजली हत्तीणीची व्यथा आयबीएन लोकमतने दाखवल्यानंतर या हत्तीणीवर उपचारासाठी अनेकांनी मदत सुरु केलीय.

 

हत्तीणीवर उपचार करणारे तज्ञ डॉक्टर आग्रा , भोपाळ, गुहावटी येथून प्रत्येकी एक तज्ञ डॉक्टर तर पुणे येथून चार डॉक्टरांची टीम उपचारासाठी दाखल झाली आहे. या डॉक्टरांनी केलेल्या उपचारामुळे बिजलीच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. बिजलीच्या मागच्या पायांना गंभीर दुखापत झाल्याने आठवडाभर जागेवर पडून होती. ‘ऍनिलम मॅटर टू मी’ या संघटने आणि ‘रॉ’ या दोन प्राणीमित्रसंघटना बिजली हत्तीणीची चोवीस तास देखभाल करत आहेत.

  • Vijay Sonawane

    think

close