सत्यमसाठी लवकरच नवी ऑडिट फर्म

January 14, 2009 2:18 PM0 commentsViews: 4

14 जानेवारीसत्यम घोटाळा प्रकरणात पीडब्ल्यूएचसी म्हणजे ऑडिटर फर्म प्राईसवॉटरहाउस कूपरलाही तेवढंच दोषी धरलं जात आहे. सत्यमसाठी नव्या ऑडिटर फर्मची नेमणूक लवकरच होणार आहे. नेटवर्क 18ला डाऊ जोन्सच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केपीएमजी आणि डेलॉईट या फर्मस्‌ची निवड पक्की होऊ शकते. पीडब्ल्यूएचसी च्या बोर्डची आज मुंबईत बैठक असल्याचंही सूत्रांनी सांगितलंय. या बैठकीला फर्मचे ग्लोबल सीईओ सॅम्युएल डि पियाझ्झा हे देखील उपस्थित राहणार असल्याचं समजलंय. पीडब्ल्यूएचसीच्या काही भागीदारांनी आग्रह धरल्यामुळे भारतातल्या मॅनेजमेंटमध्येही बदल होण्याची शक्यता दिसतेय. दरम्यान पीडब्ल्यूएचसीची चौकशी पूर्ण झाल्याखेरीज सत्यमच्या ऑडिटवर अखेरची मंजूरी देणारे त्यांचे कर्मचारी एस .गोपालकृष्णन यांच्यावर कोणतीही कारवाई करु नये ऍडव्हायझर्सनी सांगितल्याचं सूत्रांकडून समजलंय.

close