‘किंग खान’ची मराठी सिनेसृष्टीत एंट्री

June 20, 2013 5:17 PM0 commentsViews: 2037

srk in marahti sonमुंबई 20 जून : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरूख खान आता मराठी सिनेसृष्टीत एंट्री करतोय. संगीतकार शेखर रविजानी यांच्या ‘सावली’ या मराठी म्युझिक अल्बममध्ये शाहरूखची छोटीशी झलक पाहायला मिळणार आहे. या अल्बमचं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलंय.

 

रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बालक-पालक’ सिनेमा चांगलाच गाजला. पण या सिनेमापेक्षा लक्षात राहिली ती ‘बालक’रांची भूमिका…त्यातील चिऊ आणि अव्याची ‘लव्ह स्टोरी’ भल्ले कोणी विसरणार… सिनेमात यांच्या ‘लव्ह स्टोरी’वर जरी गाणं बनलं नसंल तरी याच जोडीवर शेखर रविजानी ‘सावली’ हा अल्बम साकारत आहे. आणि या अल्बममध्ये आणखी रंग भरलाय तो बॉलिवूडचा किंग खान- शाहरूख खानने…शाहरूख खानने या अल्बमची आपल्या शायरी अंदाजात सुरूवात करून दिलीय. एवढीच त्याची एंट्री…पण किंग खान मराठीत एंट्री ही नक्कीच मानाची गोष्ट म्हणावी लागेल. या अगोदरही जॅकी श्राफ, उर्मिला मातोंडकर यांनी भूमिका साकारली आहे.

close