ओरीपीनं पोलिसाला उडवलं

January 14, 2009 10:23 AM0 commentsViews: 2

14 जानेवारी, मुंबईबुधवारी पहाटे गोरेगांव लिंक रोडवर तवेरा गाडीनं धडक दिल्यानं एका पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यु झाला आहे. जितेंद्र पवार असं या कॉन्सटेबलचं नाव आहे. गोरेगांव प्रेमनगर झोपडपट्टीत लालजी यादव आणि कमलेश मौर्या या दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर लालजीनं कमलेशविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यावेळी कॉन्सटेबल जितेंद्र पवार आणि संजय सोनावणे कमलेशला पकडण्यासठी गोरेगांव लिंक रोडच्या हायपरसिटी मॉलजवळ गेले. लालजीच्या घरातील इतर पाचजणही पोलिसांसोबत कमलेशचा शोध घेत होते. पोलिस आपल्याला पकडण्यासाठी आल्याचं पाहताच कमलेश रागावला आणि त्यानं तवेरा गाडी भरधाव वेगानं पोलीस आणि लालजीच्या नातेवाईकांच्या अंगावर घातली. या धडकेनं कॉन्सटेबल जितेंद्र पवार जागीच ठार झाले तर कॉन्सटेबल संजय सोनावणे गंभीर जखमी झाले. लालजी यादवच्या कुटुंबातील जखमींना कुपर हॉस्पिटलमध्या दाखल करण्यात आलं आहे. या घटनंनंतर फरार झालेल्या कमलेशला पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान बोरिवली एमएसबी कॉलनीत अटक केली. कमलेशकडून MH 04 DE 1460 क्रमांकाची तवेरा गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.

close