औरंगाबादमधल्या अनधिकृत भूखंडावर कारवाई

January 14, 2009 10:40 AM0 commentsViews: 3

14 जानेवारी, औरंगाबाद संजय वरकड गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या क्रांती चौकातील लीजवर दिलेल्या 3 एकर जागेवर अखेर औरंगाबाद महापालिकेनं ताबा घेतला आहे. आयबीएन लोकमतने उघडकीस आणलेल्या भूखंड घोटाळ्यानंतर या कारवाईला वेग आला आणि मकर संक्रांतीच्या दिवशी ही गोड भेट औरंगाबादकरांना मिळाली. क्रांतीचौकातील 100 कोटीहून अधिक किंमतीच्या महापालिकेच्या मालकीच्या जागा धनदांडग्यांच्या ताब्यात होत्या. त्या जागा औरंगाबाद महापालिकेनं आता ताब्यात घेतल्या. महापालिकेचे आयुक्त दिलीप बंड यांच्या आदेशावरून ही कारवाई झाली. अशाच प्रकारे आणखी काही भूखंडही लवकरच ताब्यात घेतले जाणार आहेत. भूखंड ताब्यात घेण्याच्या कारवाईत महापालिकेतील काही अधिकारीच अडथळा आणत होते. पण यावेळी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. या कारवाई बाबत महापालिकेचे आयुक्त दिलीप बंड म्हणाले, खरं म्हणजे याप्रकरणाबाबत आयबीएन लोकमतनंच पुढाकार घेतला होता. ज्यावेळी ही बातमी पहिल्यांदा केली जात होती. त्याचवेळी आम्ही हे भूखंड ताब्यात घेऊ असं सांगितलं होतं. ती कारवाई आता झाली. अशाच प्रकारचे आणखी काही भूखंड महापालिका ताब्यात घेणार आहे. क्रांती चौकासारख्या मोक्याच्या ठिकाणी असलेली कोट्यवधी रुपयांचा हा भूखंड घोटाळा आणि इतरही जागांचे घोटाळे आयबीएन लोकमतनं जनतेपुढे आणले आहेत. त्यानंतर महापालिकेने कारावाईसाठी वेगानं पावलं उचलली.

close