स्मारकाला तत्त्वतः मान्यता

June 20, 2013 8:46 PM0 commentsViews: 154

shivaji maharaj smarkमुंबई 20 जून : महाराष्ट्राचं आराद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात बांधण्यातला पहिला अडसर आता दूर झालाय. हे स्मारक बांधण्यासाठी सीआरझेडा 4 च्या अंतर्गत केंद्र सरकारनं तत्वत: मान्यता दिली आहे.

यातली पहिली परवानगी मिळाली आहे तर केंद्र सरकारकडून अजून 40 परवानग्या मिळणं बाकी आहे असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय.

 

शिवाजी स्मारक सीआरझेडमध्ये आहे आणि त्यामध्ये कोणताही भराव किंवा बांधकाम करता येणार नाही. पण आम्ही केंद्राकडे स्मारकाची परवानगी मागितली होती. मुख्य म्हणजे सीआरझेड 4 मध्ये अशा प्रकारची परवानगी भारतात पहिल्यांदाच कोणत्याही प्रकल्पाला परवानगी मिळाली.

असं असणार स्मारक

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतराष्ट्रीय दर्जाचं शिवस्मारक उभारण्यात येणार आहे. मुंबईपासून साधारणत:दीड किलोमीटर अंतरावर समुद्रात शिवाजी महाराजांचा भव्य असा 309 फूट उंचीचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्मारकामध्ये अद्ययावत वस्तुसंग्रहालय, उपहारगृह, ऍम्फि थिएटर, मोठा बगीचा, 2 हेलिपॅड, एक्झिबिशन सेंटर असा सर्व सोईसुविधा असणार आहेत. थायलंडचं बेसले डिझाईन स्टुडिओ आणि मुंबईच्या टीम वन आर्किटेक्ट या दोन कंपन्यांच्या संकल्पनेतून हे शिवस्मारक उभारलं जाणार आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी सुरूवातीला राज्यसरकारने 350 कोटींची तरतूद केली आहे.

close