काश्मीरमध्ये महिलांनाही अतिरेकी ट्रेनिंग

January 14, 2009 3:52 PM0 commentsViews: 2

14 जानेवारी काश्मीरपवन बालीपाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांना अतिरेक्यांचं ट्रेनिंग सुरू आहे. सुमारे 700 महिलांना हे ट्रेनिंग दिलं जातं आहे. अशी माहिती भारतीय सीमेत घुसखोरी करणा-या एका महिलेनं दिली. आसिया असं या महिलेचं नाव आहे. पाकिस्तानच्या लष्करात हवालदार असलेल्या मोहम्मद साजदची 23 वर्षीय आसिया ही पत्नी आहे.दोन महिन्यांपूर्वी भारतीय सीमेत घुसखोरी करताना तिला राजौरीमध्ये अटक करण्यात आली होती. पाकव्याप्त काश्मीरमध्ये महिलांना दहशतवादाचं ट्रेनिंग दिलं जात असल्याची माहिती तिनंच दिली. भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या ताबा रेषेवरील भारतीय लष्कराच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी तिला पाठवण्यात आलं होतं.गेल्या वर्षी 13 नोव्हेंबरला आसियाला अटक करण्यात आली होती. यावेळी दोडामध्ये लष्कर-ए-तयबाच्या दोन महिलांनाही अटक करण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी हिजबुलसाठी काम करणा-या नहीदा अल्ताफ नावाच्या लॉ शिकणा-या विद्यार्थिनीला अटक करण्यात आली होती. त्यांनतर आता आसिया या कबुलीनंतर पाकिस्तानी दहशतवादाचा आणखी एक चेहरा समोर आलाय.

close