स्लमडॉग मिलेनियरवर अमिताभ नाराज

January 14, 2009 4:04 PM0 commentsViews: 3

14 जानेवारी मुंबईस्लमडॉग मिलेनियरबद्दल अमिताभनं व्यक्त केली नाराजी भारताची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा आरोप अमिताभने केला आहे. स्लमडॉग मिलेनियरला गोल्डन ग्लोब ऍवॉर्ड मिळाल्यानं सगळीकडे या सिनेमाचं कौतुक होत आहे. पण बॉलिवूडचा सुपरस्टार बिग बीनं मात्र आपली नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या ब्लॉगवर त्याने ही नाराजी व्यक्त केली आहे. अमिताभच्या मते स्लमडॉग मिलेनियरमध्ये भारताची गरिबी दाखवली आहे. त्यामुळे भारताची जगापुढे चुकीची प्रतिमा उभी राहते. पण रेहमानला म्युझिकसाठी मिळालेल्या ऍवॉर्डबद्दल बिग बीला अभिमानही आहे. त्यामुळे जगात भारतीय संगीताचा मान वाढला असंही त्याचं म्हणणं आहे. आणि आता आपण ऑस्करची अपेक्षा करू शकू, असंही तो म्हणाला.

close