पुन्हा मुंब्रा, इमारत कोसळून 10 ठार

June 21, 2013 3:40 PM3 commentsViews: 694

mumba buldingठाणे 21 जून : मुंब्य्रात लंकी कंपाऊंडमध्ये इमारत कोसळून दोन महिने होत नाही तेच आज पुन्हा मुंब्रा इथं आणखी एक इमारत कोसळली आहे. स्टेशन परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जण ठार झाले आहेत. तर 14 जण जखमी झालेत. मृतांमध्ये 6 महिलांचा समावेश आहे.

या ठिकाणी ढिगारा उपसण्याचं काम सुरु आहे. ठाण्यातल्या मुंब्रा स्टेशन परिसरात बाळाराम म्हात्रे स्मृती ही तीन मजली इमारत कोसळली. ही दुर्घटना मध्यरात्रीनंतर अडीचच्या सुमाराला घडली. जखमींना मुंब्रा इथल्या काळसेकर आणि कळव्यातल्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

या इमारतीमध्ये 10 कुटुंबं राहत होती. ढिगार्‍याखाली आणखी काही लोकं अडकल्याची शक्यता असून इमारतीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. यात जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.या दुर्घटनेकडं तातडीनं लक्ष घालून राज्य सरकारनं योग्य ती भुमिका घ्यावी अशी मागणी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलीय.

  • toofik pathan

    sarar laksh det nahi mhnun as hot….

  • toofik pathan

    sarkarla dakhwa…..

  • chetan

    Don’t talk any non-sense things
    Kahi zhale tari Sarkarach jabaabadaar????????????
    Kay faltu giri aahe
    New building padali kivva juni building padli nehmi sarkar jabaabdaar kashya sathi,
    sarkar kay dev aahe jyala konatihi building padaychya aadhi mahit padel

close