उद्योगपतींनी दिली मोदींना पसंती

January 14, 2009 2:22 PM0 commentsViews: 3

14 जानेवारी अहमदाबाद एकीकडे भाजपनं लालकृष्ण अडवाणी यांचा पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रचार सुरू केला आहे. तर दुसरीकडे भारतातल्या बड्या उद्योगपतींनी मात्र नरेंद्र मोदीच पंतप्रधान पदासाठी लायक असल्याचं म्हंटलंय. अहमदाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्हायब्रंट गुजरात परिषदेत बोलतांना अनिल अंबानी आणि सुनिल भारती मित्तल यांनी, मोदी हेच देश चालवायला समर्थ आहेत, असं म्हटलं आहे. जर एक राज्य मोदी इतक्या कुशलतेने चालवत असतील तर ते या देशाला नक्कीच चालवतील असं या उद्योगपतींच म्हणंण आहे.

close