पवारांनी घेतली सोनियांची भेट

January 14, 2009 3:38 PM0 commentsViews: 1

14 जानेवारी दिल्लीमुंबईतल्या जागावाटपावरून सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार खल सुरू आहे. याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली. राज्यात लोकसभेच्या 26 जागा आणि देशात इतरत्र 15 अधिक जागांची मागणी राष्ट्रवादीने काँग्रेसकडे केल्याचं समजतं. जागावाटपाबाबत आता यापुढच्या बैठका ह्या राज्यात होणार असल्याचंही कळतंय. गेल्या काही दिवसात राज्यात राष्ट्रवादीची ताकद वाढलेली आहे त्यामुळे दबावतंत्राचा वापर करून जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात कशा टाकून घ्यायच्या हा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे असं समजतं.दोन्ही काँग्रेस निवडणुका एकत्र लढवणार हे त्यांनी या आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सद्याच्या परिस्थितीत जो तणाव निर्माण झाला आहे याचा अर्थ ही आघाडी तुटेल असा काढणं चुकीचं ठरेल. सोनिया गांधी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत शरद पवारांनी जास्त जागांची मागणी केली, याचं कारण बदललेल्या मतदार संघामुळे आता परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त अनुकूल आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने अधिक जागा मागितल्या असं म्हटलं जातंय.

close