‘दोन दिवस गाडीतच मुक्काम’

June 21, 2013 6:47 PM0 commentsViews: 363

नवी दिल्ली 21 जून : उत्तराखंडमध्ये केदारनाथ, बद्रीनाथ इथे यात्रेसाठी गेलेले महाराष्ट्रातील यात्रेकरू आता सुखरूप परतायला लागलेत. पुण्यातील एक ग्रुप नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात आले आहेत. उत्तराखंडमध्ये प्रलयामुळे तब्बल दोन दिवस त्यांना एकाच गाडीत मुक्काम करावा लागला. महाराष्ट्र सदनात पोहचल्यानंतर त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक 2 हजार रूपयांची राज्यात परतण्यासाठी मदत देण्यात आली. पण त्यांचा केदारनाथ ते दिल्लीपर्यंतचा प्रवास कसा झाला ते जाणून घेतलंय आमचा सीनिअर करस्पाँडंट अमेय तिरोडकरनं

close