उत्तराखंडमध्ये मृतांचा आकडा 556 वर

June 21, 2013 8:13 PM0 commentsViews: 683

India Floods21 जून : उत्तराखंडमध्ये महाप्रलयात दगावलेल्यांचा अधिकृत आकडा आता 556 वर पोहचलाय. मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी सीएनएन आयबीएनवर बोलताना ही माहिती दिलीय. अडकून पडलेल्या 30 हजार लोकांना सुखरूप बाहेर काढल्याचं त्यांनी सांगितलं. पण, अडकलेल्या सर्व यात्रेकरूंची सुटका करण्यासाठी आणखी 15 दिवस लागतील असंही त्यांनी सांगितलंय.

केदारनाथ मंदिर इथल्या गाळात मृतदेह अडकले आहेत. गाळ आणि चिखल घेऊन आलेला पुरातून सुटका होण्याचा मार्गच नसल्यानं इथे सर्वात जास्त जीवितहानी झाली. दरम्यान, आज दिवसभरही बचावकार्य जोरात सुरू होतं.

सोनप्रयाग ते रुद्रप्रयाग आणि उत्तरकाशी ते ऋषिकेश हे रस्ते आता वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. गौरीकुंडचा रस्ताही खुला करण्यात आलाय. पुढचे आणखी काही आठवडे हे मदत आणि बचावकार्य सुरू असणार आहे. सध्या 43 हेलिकॉप्टर बचावकार्यात लागलेत. अडकलेल्या सर्व यात्रेकरूंना 1-2 दिवसात बाहेर काढलं जाईल, असं एनडीआरएफनं सांगितलंय.

संबंधित बातम्या

close