आयसीसीचा सचिनवर अन्याय

January 15, 2009 5:50 AM0 commentsViews: 4

15 जानेवारीआयसीसीने नुकतीच टेस्ट आणि वन डे मधल्या ऑल टाईम ग्रेट खेळाडूंची यादी जाहीर केली. पण आश्चर्य म्हणजे सचिन तेंडुलकरचं नाव या यादीत पहिल्या 20 खेळाडुंमध्येही नाही. आयसीसीच्या क्रमवारीनुसार सचिन 26व्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा कुमार संगकारा सचिनच्या पुढे सहाव्या स्थानावर, ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन दहाव्या तर माईक हसी आणि नील हार्वे सतराव्या स्थानावर आहेत. इंग्लंडचा कॅप्टन केविन पीटरसनही 24व्या क्रमांकावर आहे. सचिनच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास टेस्ट क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर आहेत 41 सेंच्युरी आणि 12,429 रन्स आयसीसीच्या या बेस्ट इव्हर यादीत एकमेव भारतीय आहे तो म्हणजे सुनील गावसकर. आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे ब्रायन लारा, ऍलन बॉर्डर, स्टिव्ह वॉ या सर्वाधिक टेस्ट रनच्या यादीत वरच्या क्रमांकावर असलेल्या बॅट्समननाही या यादीत स्थान मिळालेलं नाही. सचिनला ऑल टाईम ग्रेट प्लेयर्सच्या यादीत स्थान न मिळाल्याने सर्व स्तरातून टीका होत आहे. हा सरळ सरळ सचिनचा अपमान असल्याची भावना भारतीयांच्या मनात आहे. अनेक भारतीय खेळाडूंनी या निर्णयावर टीका केली आहे.

close