आणखी एक ‘मृत्यूचा सापळा’ कोसळला, 7 ठार

June 22, 2013 3:21 PM1 commentViews: 568

dahisar bilding22 जून : मुंबई महानगर परिसरात 24 तासांच्या आत आणखी एक इमारत कोसळली आहे. दहिसरमध्ये ही चार मजली इमारत कोसळली. शुक्रवारी मुंब्रा इथं इमारत कोसळली होती.

त्यात एकाच घरातल्या आठ जणांचा मृत्यू झाला होता. तर आज दहिसर पूर्वेला स्टेशनजवळच्या परिसरात पियुष ही चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत सात जण ठार झालेत तर 13 जण जखमी झाले आहे. धोकादायक अवस्थेत असल्यामुळे ही इमारत एक वर्षांपासून रिकामी करण्यात आली होती.

या इमारतीत अनधिकृतपणे राहत असलेल्या वॉचमनचा आणि कुटुंबीयांचा मृतांमध्ये समावेश आहे. काहीजण ढिगार्‍याखाली अडकले असण्याचीही शक्यता आहे.

 • निखिल भेके

  काही दिवसापूर्वी आपल्या वृत्तपत्रातून मुंबईतील काही धोकादायक इमारती विषयी बातमी छापून आली होती . त्या मध्ये प्रामुख्याने घोडपदेव येथी राजू कामाठी चाळ हि धोकादायक असून कधीही बसकण मारू शकते. म्हाडा सदर इमारत धोकादायक घोषित करणार अन अन्यत्र हलविणार असे सविस्तर पाने लिहिले होते . आम्ही मंडळी रोज या इमारती कडे पाहत येत जात असतो . बातमी वाचून आनंद वाटला . पण पावसाळा सुरु होऊन काही दिवस लोटले तरीही इमारतीतील लोक आहे त्याच ठिकाणी आहेत . आज आम्ही त्यांना हसत खेळत पाहतो आहे पण … उदया चा दिवस यांच्या आयुष्याचा कसा असेल हि चिंता मनास उद्विग्न करते .
  आज मुंब्रा , दहिसर च्या बातम्या वाचताना त्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या त्या बिचाऱ्याची अवस्थेस कोण जबाबदार ….? आपण वर्तमान पत्रात धोकादायक इमारती विषयी लिहिताना सदर इमारतीतील भाडेकरूना न्याय मिळाला कि नाही याविषयी खोलात जात नाहीत . यामुळे शेकडो जीव ढिगाऱ्याखाली जाणार नाहीत .
  मानवाच्या डोक्यावर मुंबई सारख्या ठिकाणी छप्पर लागते अन तेच जमीनदोस्त झाले तर तो मानव बेघर …. !!!
  सदर इमारती धोकादायक घोषित करण्यामागे लालफितीचे राजकारण दडले असावे . कदाचित यामुळे विलंब होत आहे.
  भाडेकरूंचे वाली सध्या तरी वर्तमान पत्रे , प्रसार माध्यमे आहेत .तेच या घर भाडेकरुना न्याय मिळवून देऊ शकतात. हे शाश्वत सत्य आम्ही नाकारू शकत नाहीत. आपण हि या संदर्भात माझगाव , घोडपदेव विभागातील राजू कामाठी चाळकरी ना न्याय मिळवून देणे साठी आवश्यक कार्यवाही अवलंबवावी . हि नम्र आणि कळकळीची विनंती
  निखिल भेके
  हुतात्मा बाबू गेनू नगर
  घोडपदेव ,मुंबई ४ ० ० ० ३ ३

close