जाफनावर श्रीलंका लष्कराचं वर्चस्व

January 15, 2009 7:26 AM0 commentsViews: 4

15 जानेवारी, श्रीलंकाश्रीलंका लष्करानं लिट्टेचा बालेकिल्ला असलेल्या जाफना भागावर पूर्ण ताबा मिळवला आहे. लष्करानं लिट्टेच्या 100 बोटी आणि शस्त्रास्त्रं जप्त केली आहेत. लिट्टेप्रमुख प्रभाकरन देशाबाहेर पळण्याच्या तयारीत आहे. किंवा तो शरणही येऊ शकतो, असा दावा श्रीलंकेच्या एका ज्येष्ठ मंत्र्यानं केला आहे. दक्षिण मुल्लाईथिवू मधल्या पुथुकुडीयिरिप्पू जंगलात श्रीलंकेच्या सैन्याचा लिट्टेवर सातत्यानं हल्ला सुरू आहे. प्रभाकरन याच भागात लपल्याचा संशय आहे.

close