विरोधी पक्षांचा माझ्या बदनामीचा डाव : मायावती

January 15, 2009 7:44 AM0 commentsViews: 4

15 जानेवारी, उत्तरप्रदेशउत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांचा आज 53 वा वाढदिवस पण या दिवसाचा उपयोग त्यांनी गेल्या काही दिवसात झालेल्या आरोप-प्रत्यारोंपाना उत्तर देण्यासाठी केला. इंजिनिअरची हत्या आणि आपल्या वाढदिवसाचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच विरोधीपक्ष आपल्याला बदनाम करत असल्याचा आरोप करायलाही त्या विसरल्या नाहीत.तसंच या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर करावाई करण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी दिलं."येत्या निवडणुकीत आमचा पक्ष चांगली कामगिरी करणार, अशी आमच्या विरोधकांना भीती आहे. त्यामुळेच सर्व विरोधकांनी एकत्र येऊन माझ्याविरुद्ध राजकीय कारस्थान आखलं आणि इंजिनिअर मृत्यू प्रकरणी मला अडकवण्याचा डाव रचला." असं त्या म्हणाल्या

close