ठाणेकरांच्या पुनर्वसनाला शिवसेनेचा विरोध

June 22, 2013 2:14 PM0 commentsViews: 500

sena on thane bulding collapsठाणे 22 जून : इथं मुंब्रामध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेत एकाच घरातल्या आठ लोकांचा मृत्यू झालाय. त्यामुळे आता ठाण्यातल्या अतिधोकादायक इमारतींमधल्या रहिवाश्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्यातच या प्रश्नाला जातीय राजकारणाचा रंग चढू लागला आहे.

मुंब्रा परिसरातल्या सुमारे एक हजार कुटुंबांचं पुनर्वसन वर्तकनगरात करायला शिवसेनेनं विरोध केला आहे. त्याऐवजी त्यांचं पुनर्वसन कौसा इथल्या झोपडपट्टीत पुनर्वसन विकास योजनेतल्या घरांमध्ये करावं अशी भूमिका शिवसेनेनं घेतलीय. या रहिवाश्यांचं पुनर्वसन करण्यासाठी एमएमआरडीएनं वर्तकनगर परिसरातल्या दोस्ती विहार प्रकल्पातल्या 1400 घरांचं हस्तांतरण पालिकेकडे केलंय.

या रहिवाश्यांचं पुनर्वसन वर्तकनगरमध्ये करावं असा मुद्दा महापालिकेच्या सर्वपक्षीय बैठकीतही मांडला गेला. मात्र शिवसेनेनं त्याला विरोध केलाय. आणि या भुमिकेला सर्व पक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा शिवसेनेच्या नरेश म्हस्केंनी केला.

close