महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला परवानगी नाकारली

January 15, 2009 10:59 AM0 commentsViews: 3

15 जानेवारी, बेळगावबेळगावात होणार्‍या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाच नेत्यांना अटक केली आहे. इतर दीडशे सदस्यांना अटक करण्यासाठी धाडसत्र सुरु झालंय. पण काहीही झालं तरी मेळावा यशस्वी करणारच अशी भूमिका समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतलीय. कर्नाटकच्या विधिमंडळाचं अधिवेशन 16 जानेवारीपासून बेळगावात होतं आहे. या अधिवेशनाच्या विरोधात महामेळावा घेण्याचा निर्णय महाराष्ट्र एकीकरण समितीनं घेतला आहे. समितीचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी कर्नाटक सरकारनं महामेळाव्याची परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारली तरी मेळावा यशस्वी करून दाखवूच, असा विश्वास आयोजक मालोजीर अष्टेकर यांनी व्यक्त केला. या प्रश्नावर सर्व मराठी नेत्यांनी एकीकरण समितीला या प्रश्नी पाठिंबा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.शिवसेनेनं या मेळाव्याला पाठिंबा जाहीर केला आहे. "कर्नाटकात भाजपचं राज्य आहे. तो भाजपाचा मित्रपक्ष आहे. त्यामुळे भाजप नेत्यांशी बोलून हा प्रश्न सोडवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. या मुद्द्यावर केंद्रातील सर्व मराठी नेत्यांनी राजीनामे द्यावेत" अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणीकराव ठाकरे यांनीही एकीकरण समितीला पाठिंबा जाहीर केला आहे.

close