उत्तराखंडची आजची परिस्थिती

June 22, 2013 5:55 PM0 commentsViews: 346

22 जून : उत्तराखंडमधला महापूर ओसरत असल्यानं आता तिथलं भीषण वास्तव समोर येतंय. या महाप्रलायत 550 पेक्षा जास्त लोक दगावलेत. तर 334 लोक बेपत्ता आहेत. अजूनही हजारो लोक ठिकठिकाणी अडकले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती सरकारनं व्यक्त केलीय.

 

तर येत्या 48 तासांत आणखी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथळे येण्याची शक्यता आहे. पूर ओसरल्याने आता बचावकार्याच्या तुकड्या दुर्गम भागातही पोचल्यात. आज सकाळी लष्करानं एक अवघड बचावकार्य पार पाडत रामबाडा आणि गौरीकुंडमध्ये अडकलेल्या एक हजार यात्रेकरूंची सुटका केली.

close