यात्रेकरूंना मदतीचा हात

June 22, 2013 6:02 PM0 commentsViews: 228

उत्तराखंडमधल्या गौचरमध्ये दिल्ली गुरुद्वारा प्रबंधक समितीनं यात्रेकरुंसाठी लंगर सुरू केलंय. गेल्या तीन दिवसांपासून हे लंगर सुरू आहे. इथे केदारनाथ आणि इतर ठिकाणांहून सुटका झालेल्या यात्रेकरूंसाठी मोफत जेवण देण्यात येतंय. सर्व यात्रेकरू परतल्याशिवाय लंगर बंद करणार नाही, असं प्रबंधक समितीच्या सदस्यांनी सांगितलंय. आपण मोफत सेवा द्यायला तयार आहोत, पण सरकारकडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केलीय.

close