निवृत्ती महाराजांच्या पालखीचं प्रस्थान

June 22, 2013 6:06 PM0 commentsViews: 195

22 जून : श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं आज त्र्यंबकेश्वरमधून प्रस्थान झालं. टाळमृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात निवृत्तीनाथांच्या पादुका पंढरपूरला रावाना झाल्यात. त्र्यंबकेश्वरमधल्या समाधी मंदिरातून या पादुकांना निरोप देण्यात आला.
त्र्यंबकेश्वराच्या दर्शनानंतर कुशावर्त कुंडात पादुकांना विधीवत स्नान घालण्यात आलं. त्यानंतर हरिनामाच्या जयघोषात या पालखीरथाने नाशिकच्या दिशेनं प्रस्थान ठेवलंय.

close