हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

June 22, 2013 1:18 PM0 commentsViews: 265

मुंबई 22 जून : इथं ओशिवारा इथल्या मीरा टॉवरमधल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या इमारतीत आयएएस आणि आयपीएस अधिकार्‍यांचे फ्लॅट्स आहेत. त्याचठिकाणी चालणारं हे सेक्स रॅकेट उघड झाल्यानं खळबळ उडालीय. या इमारतीतून पोलिसांनी वेशाव्यवसाय करणार्‍या पाच मुलींना आणि 3 दलालांना अटक केलीय.

 

यात एका टीव्ही अभिनेत्रीचाही समावेश आहे. जिथं हा वेश्याव्यवसाय चालत होता तो फ्लॅट एका व्यावसायिक महिलेच्या नावावर आहे. या महिलेनं पुण्यातल्या एका खाजगी कंपनीला हा फ्लॅट भाड्यानं दिला होता.

 

या कंपनीचा व्यवस्थापक हे सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पुढे आलीय.दरम्यान, या घटनेमुळे IAS आणि IPS अधिकारी खडबडून जागे झालेत. या अधिकार्‍यांनी मीरा टॉवरमधले आपले फ्लॅट भाड्यानं दिलेले आहेत. तिथं काही गैरप्रकार होत नाहीत ना, याची चाचपणी आता अधिकारी करत आहे.

close