कुपोषणाच्या प्रश्नावरून कोर्टानं राज्याला फटकारलं

January 15, 2009 8:37 AM0 commentsViews: 138

16 जानेवारी, मुंबईकुपोषणाच्या प्रश्नावरुन हायकोर्टानं, राज्यसरकारवर ताशेरे ओढले आहेत. कुपोषणाबाबत सरकारनं केलेल्या उपाययोजना योग्य नसल्याचं हायकोर्टानं म्हटलंय.आदिवासींना घटनात्मक अधिकार मिळत नसल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे. राजेंद्र वर्मा आणि रविंद्र कोल्हे यांनी कुपोषणाबाबत याचिका दाखल केली होती. कुपोषणाबाबत आतापर्यंत करण्यात आलेल्या उपाय योजनांची,माहिती 8 दिवसात कोर्टात सादर करण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत.

close