‘महसूल अधिकार्‍यांना 11 लाख रुपये द्यावे लागतात’

June 24, 2013 1:36 PM0 commentsViews: 516

valu mafiyaनाशिक 24 जून : राज्यभरात वाळूचा काळा कारभार होतो, हे आपण नेहमी ऐकतो. पण आता एका ठेकेदारानेच या भ्रष्टाचाराला वाचा फोडलीये. एका ठेक्यामागे महसूल अधिकार्‍यांना दर महिन्याला 11 लाख रुपये लाच द्यावी लागत असल्याचा गौप्यस्फोट वाळू ठेकेदारांनी केला.

सध्या उत्तर महाराष्ट्रात फक्त तापी नदीवर वाळूचे अधिकृत परवाने देण्यात आलेत. मात्र तेथून वाटेत येणार्‍या प्रत्येक तालुक्याची बॉर्डर पास करण्यासाठी ठेकेदारांना महसूल अधिकार्‍यांकडे पाकिटे पोहोचावी लागत असल्याच्या या ठेकेदारांच्या तक्रारी आहेत. तापी खोर्‍यापासून नाशिकमध्ये वाळूचा ट्रक येण्यासाठी 8 ते 9 तालुके लागतात.

या प्रत्येक तालुक्यातून वाळु ट्रक पास होण्यासाठी महसूल अधिकार्‍यांना प्रत्येकी दर महिन्याला 50 हजार रुपये पोहोचवावे लागतात. ज्या ठेकेदारांची पाकिटे पोहोचत नाहीत त्यांचे ट्रक नियमांचे पालन करोत वा ना करोत संध्याकाळपर्यंत पकडले जातात असा सनसनाटी खुलासा या ठेकेदाराने केलाय.तसंच अहमदनगर जिल्ह्यात लिलाव झालेले नाहीत तरीही तेथून दिवसाला 200 ट्रक वाळू नाशिकमध्ये कशी येते असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

close