राज्यात दोन ठिकाणी भीषण अपघात 17 ठार

June 24, 2013 1:58 PM0 commentsViews: 731

mumbai gova accident24 जून : आज राज्यात दोन ठिकाणी मोठे अपघात झाले. मुंंबई गोवा महामार्गावर खेडमधल्या लवेल गावाजवळ क्वालिस आणि डंपर यांचा भीषण अपघात झालाय. या अपघातात क्वालिसमधल्या 11 जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर 3 जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये 5 पुरुष 3 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे.

भरधाव जाणार्‍या डंपरने क्वालीसला दिलेली धडक एवढी जोराची होती की, क्वालिसमधील 11 जण जागीच ठार झाले. तर दुसरीकडे बीडमध्ये सोलापूर महामार्गावर अपघात झाला. या अपघातात 6 ठार तर 5 जण जखमी झालेत. मॅजिक जीप आणि ट्रक यांची समोरासमोर धडक झाली आहे. सर्व मृत जालन्याचे आहेत.जखमींना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

close