यंग ब्रिगेड ठरली चॅम्पियन्स

June 24, 2013 4:44 PM0 commentsViews: 474

dinesh_kartik_india5224 जून : महेंद्रसिंग धोणीची युवा टीम इंडिया चॅम्पियन ठरली आहे. यजमान इंग्लंडवर 5 रन्सनं मात करत भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. या स्पर्धेत भारतीय टीम अपराजित राहिलीय. आक्रमक बॅटिंग, भेदक बॉलिंग आणि चपळ फिल्डिंगच्या जोरावर भारताच्या युवा खेळाडूंनी इतिहास रचला.

 

पहिली बॅटिंग करणार्‍या भारतानं 7 विकेट गमावत 129 रन्स केले. शिखर धवन, रविंद्र जडेजा आणि विराट कोहलीनं भारताची इनिंग सावरली. विजयाचं हे आव्हान इंग्लंडला पेलवलं नाही. इंग्लंडला 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावत 124 रन्स करता आले. भारताच्या भेदक बॉलिंगसमोर इंग्लंडची बॅटिंग ढेपाळली. इयान मॉर्गेन आणि रवी बोपाराने फटकेबाजी करत मॅचमध्ये रंगत आणली. पण मॅचच्या 18 व्या ओव्हरमध्ये ईशांत शर्माने या दोघांना लागोपाठ आऊट करत मॅचमध्ये कमबॅक केलं. यानंतर जडेजा आणि अश्विननं तळाची शेपूट गुंडाळत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

close