बाबा बोडकेला पक्षात घेऊन चूक केली : अजित पवार

January 15, 2009 2:12 PM0 commentsViews: 20

15 जानेवारी'कुख्यात गुंड बाबा बोडकेला पक्षात प्रवेश दिला ही चूक झाली', अशी कबुली अजित पवार यांनी दिली आहे. ते विरार इथं एका सभेत बोलत होते. बाबा बोडके याला दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसनं अजित पवारांच्या उपस्थित पक्षात प्रवेश दिला होता.बाब बोडके हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याला खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. मात्र तरीही राष्ट्रवादीनं त्याला प्रवेश दिला होता. 'वाल्याचा वाल्मिकी' करू अशी प्रतिक्रिया या वेळी अजित पवार यांनी दिली होती. मात्र मीडियानं या प्रकाराला वाचा फोडल्यावर मोठा जनक्षोभ उसळला होता. सर्व स्तरातून या प्रकारावर टीका झाली होती. त्याची दखल घेत राष्ट्रवादीनं एका दिवसातच बाबा बोडकेची हाकालपट्टी केली होती. आता आपली चुक अजित पवार यांनीही कबूल केली आहे.

close