पोलिओच्या लसीकरणातून जंतू संसर्गामुळे चिमुरड्याचा मृत्यू

June 24, 2013 5:58 PM0 commentsViews: 383

BEED POLIO4बीड 24 जून : कान्हापूर गावात पल्स पोलिओच्या लसीकरणातून जंतू संसर्ग झाल्याने अकरा महिन्याच्या शंतनू शेळके याबालकाचा मृत्यू झाला. लसीकरणातून जंतूसंसर्ग झाल्याने शंतनूचे हात पाय लुळे पडले.

आईवडिलांनी उपचारासाठी नेले असता ताप येऊन शंतनूचा मृत्यू झाला. शंतनूच्या नातेवाईकांनी आरोग्य विभाग जबाबदार असल्याचा आरोप केलाय. मात्र आरोग्य विभागाने हे आरोप फेटाळलेत. बाळाला जन्मत: पल्स पोलिओ लस दिली होती. त्यानंतर 3 वेळेला लसीकरण करण्यात आले.

शेवटचं लसीकरण झाल्यानंतर काही दिवसांतच बाळ आजारी पडले आणि दगावले. या बालकाबरोबर गावातल्याअन्य 17 बालकांनाही हाच डोस पाजण्यात आला होता. मात्र त्या बालकांना काहीही झालेलं नाही अस आरोग्य विभागाने स्पष्ट केलंय.

close